0.3 C
New York
Friday, February 6, 2026

Buy now

spot_img

काँग्रेसचे माजी आमदार निवृत्ती उगले यांचं निधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

काँग्रेसचे माजी आमदार निवृत्ती उगले यांचं निधन झालं. वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.  आष्टी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिले होते.

 

कडा सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन, भूविकास बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

निवृत्ती उगले हे १९६७ ते १९७२ याकाळात काँग्रेस पक्षाकडून आमदार आष्टी विधनसभा मतदार संघाचे आमदार होते. १९७४ ते १९८० या काळात ते विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिले. कडा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन,भूविकास बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. यासह शासनाच्या विविध समितीवर त्यांनी काम पाहिले. अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी अशी त्यांची ओळख होती आज दुपारी चार वाजता आष्टी शहरातील वैकुंठ धाम येथे अंत्यविधी होणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles