जात-पात, धर्म याचा विचार न करता मेहबूब शेख यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार
पाटोदा | प्रतिनिधी
जातपात धर्म याचा विचार न करता आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याच्या विकासासाठी आमचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघातील उमेदवार शेख मेहबूब यांना ताकद देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आपल्यासाठी आमचे नेते शरद पवारसाहेब आणि पक्षादेश अंतिम असल्याचे ॲड. नरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधी सेलचे राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रमुख ॲड. नरसिंह जाधव हे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून पक्षाचे उमेदवार महेबुब शेख यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आपल्यासाठी पक्षादेश महत्वाचा असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, जिल्हा कार्यकारणीचे सदस्य ॲड. सय्यद वहाब यांच्या उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे अभिनंदन केले. व पक्षाच्या बाहेरून आयात उमेदवाराला उमेदवारी न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ते यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सर्व इच्छूक उमेदवारांनी पक्षाकडे केली होती. ती मागणी मान्य करून नवीन चेहरा व एक अल्पसंख्यांक समाजातील परंतु सर्व समाजाला बरोबर घेऊन नेतृत्व करणारा चेहरा उमेदवार दिला त्याबद्दल पार्टीचे आभार मानले. तसेच आष्टी मतदार संघामध्ये भय, भ्रष्टाचार, गुंडगिरी व विकास हा महत्त्वाचा मुद्दा असून जात धर्म हा मुद्दा महत्त्वाचा नाही.आजपर्यंत ज्या ज्या लोकांना आष्टी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांना तीन-तीन टन संधी देऊनही पाटोदा तालुका विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे. आष्टी मतदारसंघांमध्ये युवकांना रोजगार आष्टी मतदार संघामध्ये उद्योगधंदे मोठे उद्योग, पाटोदा, कडा, आष्टी, शिरूर या मोठ्या शहरांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत गोष्टी देखील देता आलेल्या नाहीत. अनेक खेड्यामध्ये रस्ते नाहीत. पाटोदा शहरांमध्ये देखील रस्त्यांची दुरवस्था आहे. मंजूर झालेले महामार्ग देखील पूर्ण नसल्यामुळे नागरिकांना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावा लागतात. नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनामध्ये लोकांच्या आडवणूनुक व भ्रष्टाचाराचे पेव सुटलेले आहे. यावर निवडून आलेल्या आमदारांची लक्ष असून, फक्त ठराविक लोकांना गुत्तेदारांना पोसण्याचे काम या पद्धतीने केलेले आहे. त्यामुळे जातपात धर्म याचा विचार न करता मेहबूब शेख यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदीने पाटोदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले आहे.