4.1 C
New York
Thursday, December 11, 2025

Buy now

spot_img

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडीत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडीत, फलटणमधून सचिन सुधाकर कांबळे, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारणेर मतदारसंघातून काशिनाथ दाते यांचा समावेश आहे.याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

 

 

गेवराईत काका विरुद्ध पुतण्या लढणार

 

याव्यतिरिक्त अजित पवार गटाच्या या तिसऱ्या यादीत आणखी तीन जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडीत यांना तिकीट मिळालं आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार गटाला तर आष्टी मतदारसंघ भाजपला मिळाला होता. या मतदारसंघात विजयसिंह पंडीत अपक्ष निवडणुकीची तयारी करत होते. मात्र त्यांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात काका बदामराव पंडीत विरुद्ध पुतण्या विजयसिंह पंडीत अशी लढत होणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles