महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीमध्ये अजून राज्यातील आष्टी, गेवराई सह 15 जागांवर एकमत झालेलं नाही, पण आज रात्रीपर्यंत भाजप आणि शिवसेनेची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये भाजपने 99, शिवसेनेने 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महायुतीमध्ये या जागांवरून वाद
१) आष्टी – भाजपकडून सुरेश धस इच्छुक तर या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत. ते देखील पुन्हा प्रयत्न करत आहेत.
२) गेवराई – लक्ष्मण पवार भाजपचे आमदार असून, या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे.
३) करमाळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे इच्छुक आहेत, तर भाजपने देखील दावा केलाय.
४) कलिना – भाजप आणि शिवसेनेत रस्सी खेच सुरु आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक कमलेश राय इच्छुक आहेत, तर माजी आमदार अमर्जीत सिंग आणि भाजपचे अखिलेश तिवारी इच्छुक आहेत.
५) अंधेरी पूर्व – भाजप आणि शिवसेना या दोघांचाही अंधेरी पूर्व मतदारसंघावर दावा आहे. भाजपचे मुरजी पटेल आणि शिवसेनेच्या स्वीकृती शर्मा या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.
६) चेंबूर – या जागेवर शिवसेनेचा दावा आहे, मात्र भाजप देखील ही जागा मागत आहे. शिवसेनेकडून तुकाराम काते तर भाजपकडून राहुल वाळंज आणि महादेव देवळे आग्रही आहेत.
७) दिंडोशी – दिंडोशी मतदारसंघावर शिवसेनेकडून वैभव पराडकर आणि भाजपकडून राजहंस सिंग इच्छुक आहेत.
८) आदित्य ठाकरे लढत असलेल्या वरळी मतदारसंघातून भाजपच्या शायना एनसी इच्छुक आहेत, तर शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी आपण वरळीमधून लढणार असल्याची घोषणा करून टाकली आहे.
९) वर्सोवा – भाजप आणि सेना दोघांचाही दावा भाजपातून संतोष पांडेय, भारती लव्हेकर तर शिवसेनेकडून उबाठातून उमेदवार आयात करण्याचा प्रयत्न
१०) धारावी – शिवसेनेचा दावा मात्र भाजपची देखील मागणी. गेल्या वेळेस भाजपनं लढली होती. भाजपकडून दिव्या ढोले तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे आग्रही
११) शिवडी – इथे भाजपचे गोपाळ दळवी इच्छुक आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून एखादा उमेदवार आयात करण्याची शक्यता आहे.
१२)मिरा भाईंदर- गीता जैन आणि भाजपचे नरेंद्र मेहता देखील इच्छुक
१३) कोल्हापूर उत्तर – कृष्णराज महाडिक यांच्यासाठी भाजपचा दावा तर शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर इच्छुक
१४) अक्कलकुआ- शिंदे गटाकडून विजय सिंग पराडके इच्छुक आहेत. भाजपकडून हिना गावित इच्छुक आहेत.