15.2 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

spot_img

तिकीट कोणालाच देवू नका; कोण किती पाण्यात आहे हे होऊन जाऊद्या – सुरेश धस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जागेवरून तोडगा निघत नसेल तर सुट्ट खेळू स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या 

 

आष्टी  | प्रतिनिधी

 

आष्टी विधानसभेच्या जागेवरून सुरू असलेला वाटाघाटीचा तिढा सुटत नसेल तर माझी महायुतीच्या नेत्यांनी विनंती आहे घड्याळ नको कमळ नको आम्ही तिघे म्हणजे मी सुरेश धस,भीमराव धोंडे,बाळासाहेब आजबे यांना स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या,कुणाची किती ताकद आहे आणि कुणाची किती पत आहे हे निकालाच्या कळेल तसेच कोण किती पाण्यात आहे हे ही दिसेल त्यामुळे एकदा होऊन जाऊद्या सूट्टा खेळ म्हणत धस यांनी गर्जना केली.

 

आष्टी येथील निवासस्थानी धस समर्थकांनी शुक्रवारी सकाळपासून मोठी गर्दी केली होती.गुरुवारी काही बालिश लोकांनी सोशल मीडियावर मी निवडणुकीतून माघार घेणार असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर धस समर्थकांनी आज आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत घोषणाबाजी केली.या उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलताना धस पुढे म्हणाले की,पहिल्या यादीत नाव यावं ही अपेक्षा होती.पक्षाच काम आत्तापर्यंत प्रामाणिक केले आहे.ज्या ठिकाणी भाजप निवडून येणार नाही अशा स्थानिक स्वराज्य संस्थेवर मी उभा राहिलो निवडून आलो माजी मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री यांनी सहकार्य केले.लोकसभेला देखील प्रामाणिक काम केले.2019 लोकसभा आणि आत्ताची लोकसभा कुणी प्रामाणिक काम केलं हे पक्षाने तपासाव.वाडी वस्ती तांड्यावर गेलो लोकांना मतदान करा म्हणून आवाहन केलं.बाकीच्यांनी कुठे सभा घेतल्या काय काम केलं याचा लेखाजोखा पक्षाला द्यावा.माझं काम लोकांना दिसतंय कुणाला सांगायची मला गरज वाटली नाही.संकटात लोकांना गरज असताना हे घरात गोधड्या घेऊन झोपले होते.कोरोणा काळात माझ्या दारात लोक मला भेटायला येत होते तेव्हा माझं दार 24 तास उघड होत.त्यावेळी आजी माजी कुठ होते.आता निवडणूक आली म्हणून जाती पातीच विष पेरायच काम सध्या इच्छुक उमेदवारांकडून केले जात आहे.

 

माझ्या राजकीय जीवनात मी कधी कुणाची जात विचारली नाही.पण त्यात काम करणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला गोवल जातंय ही फार मोठी शोकांतिका आहे..माझ्यावर तुतारीला भेटायला गेलो असा आरोप केला जातोय.एक जण तुतरीकडे जाण्यासाठी 1 महिन्यांपासून उठ बशा काढत होते.आता म्हणतेत मी भेटलोच नाही आणि यात तथ्य नाही.तर दुसरीकडे एक जण मी सकाळी एकाला दुपारी एकला संध्याकाळी एकाला भेटलो असा डांगोरा पिटत आहेत.त्यामुळे अशा लोकांनाबालिश बहु बायकात बडबडला…असेच म्हणावे लागेल.लाडकी बहिण कार्यक्रमाला 400 रुपये रोज देऊन महिला आनाव्या लागल्या.सगळं बोलणार आहे सगळं काढणार आहे मात्र 4 तारखे नंतर बोलायला सुरुवात करेन.

 

2019 ला स्वतःच्या चुकांनी पडले आणि आमच्यावर खापर फोडून कटप्पा बाहुबलीच्या जाहिराती कोणी दिल्या.मग त्या बाहुबलीला सांगू इच्छितो निवडणुकीच्या काही दिवसात लागलेल्या नगरपंचायत निवडणुकीत आष्टी पाटोदा शिरूर कासार या तिन्ही नगरपंचायत कशाकाय माझ्या ताब्यात लोकांनी दिल्या.याच एकच कारण 24 तास तेवढं लोकांसाठी झिजाव लागतं.सुखात दुःखात जाव यावं लागतं.आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आष्टी विधानसभेच्या जागेवरून सुरू असलेला तिढा अजूनही सुटला नाही.आणि तो जर सुटत नसेल तर माझी महायुतीच्या प्रमुख नेत्यांना विनंती आहे,तोडगा निघत नाही ना तर मग या मतदार संघात घड्याळ देऊ नका,कमळ देऊ नका आम्हाला तिघांना स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या म्हणजे सुट्टा खेळ होईल.जो निवडून येईल त्याला त्याचा पक्ष स्वतंत्र वाहनाने मुंबईला घेऊन जाईल.अशी गर्जना करत सुरेश धस यांनी निवडणुकीत रंग भरला आहे.यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते निवासस्थानी आले होते.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles