-3 C
New York
Friday, February 6, 2026

Buy now

spot_img

कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; २ कर्मचाऱ्यांवर पोलीसात गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर बीडच्या शासकीय विश्रामगृहातील सूट इतर लोकांना दिला होता. विशेष म्हणजे विश्रामगृहातील हा सुट इलेक्शन ऑबझरव्हरसाठी आरक्षित होता. यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.

 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात इतरांना प्रवेश देण्यात आला. आचारसंहितेच्या काळात शासकीय विश्रामगृहातील सुट बाहेरच्या कोणालाही देता येत नाहीत. मात्र बीडच्या शासकीय विश्रामगृहात हा प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे इलेक्शन ऑबझरव्हरसाठी आरक्षित असलेल्या सुटमध्ये रात्री इतर लोक दिसून आले. हा सर्व प्रकार खुद्द जिल्हाधिकारी यांच्या तपासणी दरम्यान समोर आला.

 

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल 

 

या सर्व प्रकारामुळे जिल्हाधिकारी पाठक यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे यांच्या फिर्यादीवरून बीड बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अक्षय भागवत आणि विश्रामगृह मॅनेजर अकबर पटेल या दोघांवर बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles