0.1 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये तर महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. तसेच राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे.

काय आहे योजना?

फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास

तसेच महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. महिला खरेदीदाराला घर खरेदी करताना १ टक्का सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार १५ वर्षांपर्यंत महिलेला पुरुष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. ही अट शिथील करुन इतर सवलती देण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पात महिलांसाठी करण्यात आलेल्या घोषणा पुढील प्रमाणे-

  1. – महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारणार
  2. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर उभारणार
  3. मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार
  4. महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार
  5. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करणार
  6. आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करणार
  7. गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करणार
  8. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करणार
  9. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये करणार
  10. अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करणार
  11. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
  12. अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
    विकसित करणार
  13. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करणार
  14. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवणार. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देणार. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles