14.1 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img

महिला अत्याचार प्रकरणात माजी आमदाराला अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

 

 

राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मुरकुटे यांना मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूरमधील राहत्या घरातून अटक केली. तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे. या महिलेने काल, सोमवारी राहुरी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

माजी आमदार मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात. श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून तसेच अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी अलीकडे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार टीका केली होती.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles