16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आजपर्यंत एकही नारळ बिगर मंजुरीचे फोडले नाही कोणी फोडले ते जनतेला माहीत आहे -आ.बाळासाहेब आजबे यांनी कुणाला हाणला टोला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

 

गेल्या पाच वर्षाच्या काळात आपण मतदार संघात जे काम मंजूर झाले त्याचेच नारळ आपण फोडले असून एकाच कामाचे 10 वेळेस नारळ फोडण्याचे काम आम्ही करत नाहीत, अगोदर काम मंजूर आणि नंतर नारळ असे आमचे काम आहे हे जनतेला पण माहीत आहे,मतदार संघात रास्ते,वीज आणि पाणी हे तीन प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रामुख्याने ५६८ ट्रान्सफॉर्मर,कोल्हापुरी बंधारे व रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आजपर्यंत एकही नारळ बिगर मंजुरीचे फोडले नाही कोणी फोडले ते मतदारसंघातील जनतेला माहीत असल्याचा टोला माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव न घेता  आमदार बाळासाहेब आजबे यांनी लगावला आहे.

 

 

आष्टी तालुक्यातील केरूळ,शेलारवाडी, मोरेवाडी व आंधाळे वस्ती गावात झालेल्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शनिवार (दि.५)रोजी सकाळी १० वा.आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ.आजबे बोलत होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंडित पोकळे,दिलीप चव्हाण,महादेव महाजन,संतोष गुंड,मधुकर अनारसे,राम गोंदकर,बबन रांझणे,नाजिम शेख यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.दहा लाखांचे सभामंडप मतदार संघातील १५० गावात दिले आहेत.ह्या सभामंडपाचे काम करण्याचा उद्देश म्हणजे गावातील कार्यक्रम व्हावेत हा आहे.मी मतदार संघात जे कामे मंजूर झालेत त्याच कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहे.मोकार घोषणा आणि कार्यक्रम घेत नाही.पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात वीज,पाणी आणि रस्ते काम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.तसेच उपजिल्हा रुग्णालय,शेतक-यांसाठी कृषी प्रशिक्षण इमारत तसेच तिन्ही तालुक्यात कृषी भवन इमारती यासह विविध विकास कामे केले.तसेच आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वाधिक निधीही आपण आणला असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

 

 

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते महादेव महाजन , पंडित पोकळे, संचालक उत्पन्न बाजार समिती कडा माजी सभापती संतोष गुंड,  गटप्रमुख दिलीप चव्हाण , मधुकर अनारसे, माजी पंचायत समिती सदस्य राम गोंदकर , संदीप गोंदकर सागर अनारसे, हबीब भाई , शिंदे संतोष वाघमारे मोहन मोरे नितीन सूर्यवंशी हरिदास मोरे अलीम शेख, दादा जमदाडे , बबलू शेख, ज्ञानेश्वर गवते, किसन शेलार, आप्पा शेलार , अशोक पुंड,  राम अनारसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles