1.3 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img

बदलत्या राजकिय समीकरणामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात ॲड. नरसिंह जाधव ठरणार गेमचेंजर!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड | प्रतिनिधी

 

बदलत्या राजकिय समीकरणामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण आष्टी मतदार संघात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातच मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेला लढा त्यामुळे मराठा, ओबीसीमधील वाढता संघर्ष यामुळे निवडणुकीतील मताचे जातीय समीकरण बदलले आहे. तसेच प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात असलेली नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच नवा चेहरा म्हणून सर्व सामान्य कुटुंबातील ॲड. नरसिंह जाधव यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर ॲड. जाधव हे आष्ठीच्या राजकारणातील गेम चेंजर ठरु शकतात.

 

 

 

आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदार संघ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रशासकीय तसेच राजकीय पातळीवरही वेग येऊ लागला असून इच्छुक उमेदवार मतदार संघात पायाला भिंगरी लावून गावागावात जाऊन लोकांच्या भेटी घेऊन आपणच उमेदवार असल्याचे सांगून निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मतदारसंघात यंदा प्रस्थापितविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याने परिवर्तनाची लाट लोकांमध्ये दिसून येत असून, लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेले मतदार विधानसभा निवडणुकीतही आपला इफेक्ट दाखवून देतील असेच एकंदर वातावरण दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट होत नसल्याने भाजपच्या नेत्यांविरुद्ध या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

 

 

 

 

महायुतीचे प्रमुख आणि इच्छुक काहीसे टेन्शनमध्ये

 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे अवघ्या सहा हजार मतांनी निवडून आले. पंकजा मुंडे यांच्या याच पराभवात आणि सोनवणे यांच्या विजयात सगळ्या मोठा हातभार लागला तो आष्टी विधानसभा मतदारसंघाचा. आष्टीमधून पंकजा मुंडे यांना 32 हजार 254 मतांचे मताधिक्य मिळाले. सुरेश धस, भिमराव धोंडे, अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे हे तीन मोठे नेते असताना बजरंग सोनवणे यांना येथे चांगले मते मिळालेत. तीन आमदार असतानाही भाजप उमेदवार मुंडे यांचे मताधिक्य घटल्याने भाजप नेत्यांविरोधात मुंडे यांना मानणाऱ्या मतदारांचा राग आहे.आता आष्टीमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. पण तीन स्थानिक नेते महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीचे प्रमुख आणि इच्छुक काहीसे टेन्शनमध्ये आहेत.

 

 

 

 

पवारांचे एकनिष्ठ म्हणून जाधव कुटुंबीयांची जिल्ह्यात ओळख

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून पाटोदा येतील शरद पवारची कट्टर समर्थक ॲड नरसिंह जाधव हे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी मतदारसंघात संपर्क दौराही जोरात सुरू केलेला आहे. पवारांचे एकनिष्ठ म्हणून जाधव कुटुंबीयांची जिल्हाभरात ओळख आहे. सामान्य मराठा समाजातील उमेदवार म्हणून जाधव यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळें जाधव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याने त्यांनाही लोकातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे जाधव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी म्हणजे पवारांचा आशीर्वाद या आशीर्वादाबरोबरच मतदार संघात इफेक्टिव्ह ठरणाऱ्या जरांगे पाटील इफेक्ट हे समीकरण आगामी निवडणुकीत जाधव यांच्याच पत्थ्यावर पडणार असल्याचे चित्र आष्टी मतदार संघात दिसून येऊ लागले आहे.

 

 

 

राजकीय समीकरण बिघडलेले

 

आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाचे आतापर्यंत माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी मंत्री सुरेश धस यांनी केलेले आहे. सध्या विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. मात्र राज्यात घडलेल्या सत्तांतराच्या घडामोडीनंतर राजकीय समीकरण बिघडलेले आहे. त्यातच मराठा आरक्षनामुळे राज्यात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष यामुळे मतदार संघातील गणितही अवघड होऊन बसलेले आहे. याचा प्रत्यय झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना आलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार देताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

 

 

2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे यांनी विजय मिळवला होता. कसलीही यंत्रणा नसताना केवळ पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना आमदारकी मिळाली होती. 2019 ला मोदी लाट असतानाही धोंड्यांचा पराभव झाला होता. केवळ धोंडे यांच्याबद्दलची मतदारात असलेली नाराजी आणि बदल म्हणून मतदारानी आजबे यांना निवडून दिले होते. मात्र त्यांच्याही पाच वर्षाच्या काळात मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांच्याबद्दलही मतदारसंघात फारशी सहानुभूती असल्याचे दिसून येत नाही. तसेच त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना सोबत गेल्याने पवारांना मानणारा मतदारही नाराज झाले आहेत. तसेच सत्तेसाठी निवडणुकीवेळी पक्ष बदल करणारे अशी प्रतिमा तयार झाली असल्यामुळे जनतेत प्रस्थापित नेत्यांविषयी आता तीव्र नाराजी व्यक्त होत असून नवीन नेतृत्वाची गरज असल्याचे लोक बोलून दाखवत आहेत. मात्र असे असले तरी निवडणुकीसाठी प्रस्थापित नेत्यांचीच नावे पुढे येत आहेत. सत्ताधारी भाजप महायुतीकडून भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे, माजी मंत्री सुरेश धस आणि राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबुब शेख, ॲड. नरसिंह जाधव, अमोल तरटे, राम खाडे, बापूसाहेब डोके आदी इच्छुक आहेत. यामध्ये ॲड. नरसिंह जाधव सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

 

 

जे लोकसभेला झाले ते विधानसभेला टाळण्यासाठी भाजपचा प्रयत्न

 

दुसऱ्या बाजूला जे लोकसभेला झाले ते विधानसभेला टाळण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. पण विद्यमान आमदार आणि दोन इच्छुक माजी आमदार असे तिन्ही नेते युतीतच आहेत. त्यामुळे मतदारसंघ नेमका कोणाला सुटणार आणि अन्य दोघांना कसे थांबवणार? यातील कोणी बंडखोरी केली तर काय? त्याचे काय परिणाम होणार? याचे वेगळेच टेन्शन आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतून शरद पवार हे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. बजरंग सोनवणे हे खासदार झाल्याने त्यांच्याही नेटवर्कचा इथे शरद पवार यांना उपयोग होऊ शकतो. शिवाय जरांगे इफेक्टचाही महाविकास आघाडीला फायदा होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक चुरशीची होईल असे दिसते.

 

 

 

 सर्व सामान्य कुटूंबातील उमेदवार

 

महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसची ताकद अस्तित्वापूर्ती आहे. स्थानिक पातळीवर शरद पवार इथून नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती आहे. ॲड. नरसिंह जाधव या सामान्य मराठा समाजातील नवीन चेहऱ्याला त्यांच्याकडून रिंगणात उतरवले जाऊ शकते. असे झाल्यास पवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांना आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पवार समर्थकांची साथ मिळू शकते तसेच मराठा आंदोलक जरांगे समर्थकही सर्वसामान्य मराठा समाजाच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून जाधव यांच्या पाठीशी राहतील असे झाल्यास आष्टी मतदार संघात 2024 च्या निवडणुकीत परिवर्तन आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळू शकते अशी चर्चा होताना दिसून येत आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles