18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विधीमंडळात गदारोळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

सभागृहाच कामकाज सुरु होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विधीमंडळात गदारोळ सुरु झाला. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतमालाला भाव नाही त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्याचे सांगितले. त्याचबरोबर कांदा प्रश्नावरुनही विरोधी बाकावरुन सभागृहात शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

 

विधिमंडळाच्या बाहेरही विरोधकांची घोषणाबाजी

विकासकामांना स्थगिती देणार्‍या सरकारचा धिक्कार असो…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे…जाहीर करा जाहीर करा नुकसान भरपाई जाहीर करा…शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… सरकार तुपाशी शेतकरी उपाशी…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज (दि.९) सकाळी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

 

शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प
राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता आहे.

 

राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले आहेत. या आठ महिन्यांत शिंदे यांनी निर्णयांचा धडाका लावला. त्यामुळे त्यांच्या या कार्यशैलीचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटेल, अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. लोकसभा निवडणुकीमुळे पुढील वर्षी सरकारला हंगामी अर्थसंकल्प सादर करावा लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर होणार्‍या अधिवेशनात सरकारला पूर्ण अर्थसंकल्प मांडता येईल. मात्र, तोपर्यंत राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहणार असल्याने यंदाचा अर्थसंकल्प शिंदे सरकारसाठी महत्त्वाचा आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles