निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर आता प्रशासनिक हालचालीही जोरात सुरू झाल्या आहे. राज्यातील नायब तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीला हस्तांतरित करण्यात आले आहे.सोबतच बदलीस पात्र नायब तहसीलदार यांची यादी ही संबंधित विभागीय आयुक्तांना देण्यात आली आहे. या बाबत उद्यापर्यंत बदलीस पात्र सर्व नायब तहसीलदारांच्या बदल्या कराव्या, असे निर्देश मंत्रालयातून जारी करण्यात आले असल्याची माहितीही पुढे आली आहे.
बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीवर
निवडणूक आयोगाने अनेक महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली संदर्भातले नियम स्पष्ट केले होते. मात्र राज्यातील नायब तहसीलदारांच्या बदली प्रक्रियेत त्या नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. म्हणून राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यात निवडणूक आयोगानं या विषयी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नायब तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीवर हस्तांतरित करण्यात आले आहे.
नायब तहसीलदारांच्या बदली बाबत निवडणूक आयोगाची नाराजी
3 वर्षांपेक्षा जास्त ज्या अधिकाऱ्यांची सेवा झाली त्यांना तात्काळ बदला असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसांत बदल्या करा, असे आदेश दिले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज पार पडली. यामध्ये निवडणुकीच्या संदर्भातील महत्वाची माहिती त्यांनी दिली.
कधी होणार विधानसभेची निवडणूक?
दिवाळी आणि छट पूजा हे सण लक्षात घेऊन तारखा जाहीर कराव्यात अशी या पक्षांनी विनंती केल्याची माहिती निवडणूक आयोगानं केली आहे. पक्षांनी अशी देखील विनंती केली की मोबाईल सोबत असल्यामुळं अनेकांना मतदान करता आलं नव्हतं ,त्यामुळे विधानसभेला याचा विचार व्हावा. मतदानासाठी जाताना मोबाईल परवानगी नाही. मात्र सोबत जर मतदार मोबाईल घेऊन गेला असेल तर तो ठेवण्याची व्यवस्था करावी अशी देखील विनंती पक्षांनी केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. फेक न्युज वाढत आहे त्याचा बंदोबस्त करण्या बाबत देखील सांगण्यात आलं आहे.