18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

तू सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, शरद पवारांचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आलास? हा पक्ष कोणी काढला सगळ्या हिंदुस्थानला माहितीये. त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, असा इशारा शरद पवार यांनी अजित पवारांना बरोबर गेलेल्या आ. सुनील टिंगरे यांना दिला आहे.

 

खराडीमध्ये झालेल्या सभेत बोलताना शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. रांजणगावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं. तसं उद्योगांचंही दर्शन होतं. पुण्यात आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं? पुण्याची चौकशी केली तर लोक काय सांगतात? कोयता गँग, अलीकडची पिढी काय खाते माहिती नाही. कसल्या तरी गोळ्या खातात. त्या गोळ्या खाल्ल्या की चंद्रावर जातात. सत्ताधारी काय करतात? हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आमचे आमदार दमदार आमदार…. हा आमदार दमदार आहे? त्याचं नाव काय टिंगरे…. तो कुणाच्या तिकिटावर निवडून आला? त्यावेळी पक्षाचा नेता कोण होता? पक्षाची स्थापना कोणी केली? तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देवू नकोस. एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मुलांना उडवलं. अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मते मागितली का? शरद पवारच्या नावाने मते मागितली, श्रद्धेने मते दिली. त्याचं तुम्ही असं उत्तर दायित्व केलं?, असे म्हणत शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांचे कान धरले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles