18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; अडीच लाखांचा दंड, पैसे न भरल्यास 7 पिढ्यांना जातीतून बहिष्कृत करणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सासऱ्याने जुन्या काळात जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने जातपंचायतीने सासऱ्याला अडीच लाखांचा दंड ठोठावला व जातीतून बहिष्कृत केले. हा थकीत दंड आता त्यांचा मुलगा व सुनेने भरावा, असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. मात्र, दंड भरण्यास मुलगा व सुनेने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांना व त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांना, जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय जातपंचायतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे उघडकीस आला. याप्रकरणी ८ जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जातपंचायतीचा जाच पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 

आष्टी तालुक्यातील कडा साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या मालन फुलमाळी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्या पती, दोन मुले व एका मुलीसह कडा कारखाना येथे वास्तव्यास आहेत. त्या नंदीवाले तिरमली या जातीच्या आहेत. त्यांच्या सासऱ्यांनी जातीतच प्रेमविवाह केलेला होता. मात्र जातपंचायतीने या विवाहावर आक्षेप घेतला व त्यांच्या सासऱ्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तो दंड सासऱ्यांनी भरलेला नव्हता. त्यामुळे त्यांना जातीतून बहिष्कृत केले होते.

 

२२ सप्टेंबर रोजी डोईठाण येथे जातपंचायत भरली होती. या वेळी मालन फुलमाळी यांना पंचायतीने बोलावून घेत हा थकीत दंड भरण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी दंड भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर जातपंचायतीने मालन यांच्या कुटुंबीयांना व पुढच्या सात पिढ्यांना जातीतून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले.

 

याप्रकरणी जातीचे पंच गंगाधर पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा), उत्तम फुलमाळी (रा. जेऊर ता. नेवासा), गंगा फुलमाळी (रा. पाटसरा, ता. आष्टी), चिभू फुलमाळी (रा. डोईठाण, ता. आष्टी), सुभाष फुलमाळी (रा. शनी शिंगणापूर), बाबुराव फुलमाळी (रा. निमगाव, ता. कर्जत), शेटीबा काकडे (रा. वाळकी), सयाजी फुलमाळी (रा. पिंपळनेर ता. बीड), गुलाब पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles