19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून ‘हा’ उमेदवार फायनल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला मात्र लोकसभा निवडणुकीत चांगली जबरदस्त कामगिरी करता आली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव बजरंग सोनवणे यांनी केला. यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. आता दोन्हीही गट आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी करत आहेत. बीड जिल्ह्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ असून यातील 5 जागा आष्टी, बीड, माजलगाव, केज आणि परळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक मोठी काटेदार होणार असे दिसत आहे. या मतदारसंघात आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

 

आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ? याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

 

दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी कोणाची वर्णी लागू शकते याचे संकेत मिळु लागले आहेत. खरंतर महायुतीमध्ये या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत हे काही वेगळे सांगायला नको. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेसह भाजपचे माजी मंत्री सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे हेही महायुतीमध्ये या जागेसाठी इच्छुक आहे. महायुतीची उमेदवारी कुणाला एकाला मिळाली तरी बंडखोरी होणार हे निश्चित आहे.

 

महाविकास आघाडीकडून मात्र यावेळी नवीन चेहऱ्याला संधी देणार असल्याचं संकेत मिळत असल्याने शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे पाटोदा तालुक्यातील माजी पं. स. सभापती ॲड. लक्ष्मणराव जाधव यांचे सुपुत्र ॲड. नरसिंह जाधव यांना संधी मिळू शकते. शरद पवार गटाचे ॲड. नरसिंह जाधव यांनी नुकतीच बारामती येथे कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील एकमेव असे जाधव कुटुंब आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले असल्याचा उल्लेख करीत शरद पवार यांनी ॲड. नरसिंह जाधव यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील सहा जागांवर शरद पवार गटातील उमेदवार उभे राहतील असा देखील दावा केला जात आहे.

 

 

गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत या जागेवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी टफ फाईट पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे निवडून आले होते. कसलीही यंत्रणा नसताना केवळ शरद पवारांवर प्रेम करणारे अनेक लोक या मतदारसंघात आहेत. पवारांचा उमेदवार आला की डोळे झाकून मते दिली जातात. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे. येथून गेल्यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे विजयी झालेत. अटीतटीच्या या लढतीत आजबे यांनी बाजी मारली असली तरी देखील गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. दोन पक्ष फुटल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि प्रथमच आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात काटेदार लढाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाच्या वाटेला येणार आणि येथून ॲड. नरसिंह जाधव हे उमेदवार असतील अशी चर्चा  आता जोर धरू लागली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles