23.3 C
New York
Saturday, October 5, 2024

Buy now

spot_img

शरद पवारांच्या भेटीनंतर ॲड. नरसिंह जाधव यांना आष्टी मतदार संघात जनसामान्यांची पसंती वाढली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा | प्रतिनिधी

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा जोर चांगलाच वाढू लागला असून, इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी आटापिटा करू लागले आहेत. उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा जनसंपर्क दौऱ्यातून केला जात आहे. यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार ॲड.नरसिंह जाधव यांनी गेल्याच आठवड्यात शरद पवार यांची भेट घेऊन मतदार संघात केलेल्या संपर्क दौऱ्याचा अहवाल सादर केल्यानंतर पवार यांनीही जाधव यांना वेगाने संपर्क दौरा वाढविण्याची सूचना करून उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल दिल्याने आता आष्टी मतदार संघातून ॲड. नरसिंह जाधव यांना जनसामान्यातून मोठी पसंती मिळू लागली आहे. मतदारसंघातील अनेक गावातून त्यांना भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. गावागावातून गणेश मंडळाचे आरतीचे निमंत्रणे, संपर्क दौऱ्यात गावागावातून मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात येत असून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासनही नागरिक आता जाधव यांना देऊ लागले आहेत.

 

पाटोदा तालुक्याचा दौरा जवळजवळ पूर्ण करत आता शिरूर तालुक्यात त्यांनी दौऱ्याला सुरवात केलेली दिसत आहे जाटनंदुर, शिंदफाना, राक्षसभुवन, गोमळवाडा, शिरूर शहर अ‍ॅड. जाधव यांनी रविवारी आदी गावांना भेटी दिल्या.
डोंगरकिन्ही येथे सरपंच अण्णासाहेब येवले, तालुका कार्यध्यक्ष बाबुराव म्हस्के, ग्रा.प.सदस्य नवनाथ मळेकर, केशव चव्हाण, राजेंद्र मस्के आदींची भेट घेतली. तर जाटनांदूर येथे गंगाराम जेधेसर, सुंदरबापू जेधे, महदेव जेधे, बाळासाहेब जेधेसर, नामदेव चव्हाण, अशोक चौधरी, गौतम घायाळ, चेअरमन एस. पी. चौधरी, सरपंच सचिन माने आदी गावकरी उपस्थित होते. नाळवंडी येथे माजी सरपंच विठ्ठल गुजर, माजी सरपंच भगवान काकडे, पोलीस पाटील विठ्ठल पठाडे, भरत गुजर, ग्रा.पं. सदस्य गणेश मळेकर, तालुका सरचिटणीस मौलाभाई शेख,शहामद शेख, बबन पाटील आदी ज्येष्ठ मंडळी अ‍ॅड. जाधव यांचे स्वागत केले.

 

पाटोदा तालुक्यातून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून ॲड. नरसिंह जाधव हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे आपल्याला उमेदवारीची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील गावागावात भेटी देऊन सर्व सामान्य लोकांशी चर्चा केली. यावेळी जनतेतून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदार संघातील प्रस्थापित नेत्याबद्दलचा रोष नागरिक बोलून दाखवित आहेत.

 

संपर्क दौऱ्यात तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा करण्यात येऊन. सर्व सामान्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावले जात आहेत. काही प्रकरणात न्यायालयीन लढा लढण्यासाठी कायदेशीर मदतही लोकांना होत असल्याने जनतेतून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles