-5.7 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

spot_img

स्वातंत्र्य सैनिकांच्या 3000 पाल्यांच्या नोकऱ्या जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर येणार आहे.

ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही, तर थेट नियुक्ती झाली आहे अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 3000 यांच्यावर स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याच्या नोकऱ्या संपुष्टात येत आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णया ची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचना त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात जे भगवान महासंघ आंदोलन करणार आहे. बाळासाहेब सानप यांनी सरकारला याबद्दल इशारा दिला आहे.

दरम्यान या संबंधीची शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra,gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles