15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा! मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, विधानसभेत घाम फोडू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पिंपळवंडी |

सरकारने मला मारायचे ठरवलं आहे. मला संपवायचे ठरवले आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांना माहित नाही मला मारणे सोपं नाही हे आग्या मोहळ सोपं नाही अशी थेट टीका मनोज जरांगेंनी आज आष्टी तालुक्यातील पिंपळवंडी येथे घोंगडी बैठकीतून केली आहे.

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक मारली आहे. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेण्यासाठी १७ तारखेला पुन्हा एकदा मी शेवटचं उपोषण करत आहे असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात फूट पाडण्याचे काम केलं पैसे देऊन लोक आंदोलनात पाठवली पण येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ,पाच हजाराची लीड तोडताना तोंडाला फेस आला पाहिजे असे आव्हान थेट जरांगेंनी फडणवीसांना विधानसभेसाठी दिले आहे.

 

 

१७ तारखेला आमरण उपोषण करणार आहे. आता सरकारने १७ सप्टेंबरच्या आतच आरक्षण द्यावे. कारण आताचे आमरण उपोषण कठोर आणि टोकाचे होणार आहे याची सरकारने नोंद घ्यावी असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ठरवलेल्या मागण्या पूर्ण करा नाहीतर तुमची एकही सीट मराठी निवडून येऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी भरमंचावरुन दिला आहे. “तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिले तर तुम्हाला आम्ही खुर्ची मिळू देणार नाही जे जे आमदार तुम्हाला त्रास देतील त्याचा २०२४ च्या विधानसभेत हिशोब करा. सरकारने पैसे देऊन विरोधात आंदोलन उभे केले आहे. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करत आहे. हे सगळं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. मराठ्यांचे लेकरांची दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत हे डोळ्यासमोर आपण पाहत आहोत कुठला पक्ष आणि कुठला नेता चुलीत घाला,लेकरांसाठी एकत्र या आणि यांना जागा दाखवून द्या असे आवाहन मराठा समाजाला मनोज जरांगेंनी केले.

 

मनोज जरांगे यांचे भावनिक भाषण..

मराठ्यांची मूल दिवसाढवळ्या आत्महत्या करत आहेत हे सरकारला दिसत नाही का? हरामखोर सरकारने मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचीच आंदोलन उभी केली. माझा परिवार आणि कुटुंब तुम्ही आहात माझ्यावर जबाबदारी आहे की, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण देण्याची पण भावनिक होऊ नका लेकरांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवा. स्वार्थासाठी आमरण उपोषण करत नाही समाजाचे लेकरं मोठी व्हावी म्हणून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठ्यांवरती अन्याय केला जातोय. एकदा निवडणुका झाल्या की पुन्हा आपल्याला कोणी विचारणार नाही. आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आपल्याला आरक्षण मिळवायचे आहे.

मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही, मला सरकारचं काही नको आहे. फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. उमेदवार उभा करायचे ठरवले तर मराठा उमेदवार हरु देऊ नका. मी जर पाडायचे ठरवलं तर आता नाव घेऊन पाडणार आहे. सरकारमधील नेत्यांच्या रात्रीच्या बैठका वाढल्या आहेत पण मी त्यांना फुटत नाही, जीव गेला तरी चालेल पण मी आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबत नाही. लढाई जिंकायची आहे लढाई हरू द्यायची नाही मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायच आहे अशी भावनिक साद आज मनोज जरांगेंनी मराठा समाजाला घातली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles