5 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

अखेर केंद्र सरकारने खेडकर बाईंची केली हकालपट्टी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देऊन आयएएस झालेल्या पूजा खेडकर बाईंना मोठा धक्का बसला आहे. पूजा खेडकर हिची अखेरीस केंद्र सरकारने हकालपट्टी केली आहे. 6 सप्टेंबर 2024 च्या आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केलं आहे. त्यामुळे अखेरीस पूजा खेडकर या बनावटगिरी प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

 

बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अखेरीस केंद्र सरकारने कारवाई केली आहे. तीन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणखी एक रिपोर्ट दाखल केला होता. यात पूजा खेडकरच्या दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. पूजा खेडकरने सिव्हिल सेवा परीक्षा २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेत दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती. मेडिकल अथॉरिटी अहमदनगर महाराष्ट्र यांनी ती जारी केली होती.

 

दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये पूजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं मान्य केलं होतं. नागरी परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान दाखल केलेलं प्रमाणपत्र बनावट आहे. पूजा खेडकर यांनी प्रमाणपत्रात नाव बदलेलं आहे. हे बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावाही खोटा असल्याचं निष्पन्न झालं होतं. पूजा खेडकरने या दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करून युपीएससीच्या निवडीत विशेष सवलत मिळवली होती. कमी गुण मिळाल्यानंतरही तिला दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सूट मिळाल्याने उत्तीर्ण होता आलं होतं. तिने 841 रँक मिळवली होती. अखेरीस दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं तिची प्रमाणपत्रं खोटी असल्याचं उघड केलं. एवढंच नाहीतर, पूजा खेडकरनं जी प्रमाणपत्रं दिली ती अहमदनगरमधून जारी केली होती आणि ती खोटी असण्याचंही दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलं होतं.

 

काय आहे प्रकरण?

 

पूजा ही 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असल्याचं सांगितलं गेलं. जून 2024 महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या, त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं. मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला आणि महाराष्ट्र सरकारचं चिन्ह लावलं होतं. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते. स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. वाद वाढल्यानंतर तिची वाशिमला बदली सुद्धा करण्यात आली होती. अखेरीस आता केंद्र सरकारने पूजा खेडकर बाईंना कार्यमुक्त केलं आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles