18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

सरसकट सगळ्यांना पक्षात घेणार नाही, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ-शरद पवार 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात लोकांचं इन्कमिंग वाढलं आहे. शरद पवार सध्या चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान कालच समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.त्यानंतर आता येत्या काळात आणखी काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शरद पवारांनी भाष्य केलं. सरसकट सगळ्यांना पक्षात घेणार नाही, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले.

 

कुणाला पक्षात घेणार?

 

ज्या भागातले लोक आमच्या पक्षात यायला तयार आहेत. त्या मतदारसंघात जे आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिले. त्या लोकांची मतं जाणून घेतली जात आहेत. त्या व्यक्तीची पक्षासाठीची उपयुक्तता किती आहे? हे जाणून घेत आहोत. त्या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनातलं काम याची आम्ही नोंद घेत आहोत, ज्यांचं काम समधानकारक आहे त्यांच्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले.

 

फडणवीसांना सुनावलं

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची सुरतची लूट केलीच नव्हती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. वस्तुस्थिती वेगळी असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं केलं की, लूट करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नव्हतं. पण हे असं बोलणं योग्य नाही. चुकीच्या पद्धतीन इतिहास मांडण्याचं काम केलं जातंय. राज्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वेगळी विधानं केली जात आहेत. खोटा इतिहास हा जनतेसमोर, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात, असं शरद पवार म्हणाले.

 

 

 

बदलापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं. यावर बोलताना बदलापूरमधील लोक आम्ही जमा केले नव्हते. तो लोकांना उद्रेक होता. लहान मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे लोकांचा संताप झाला. लोक रस्त्यावर उतरले. सरकारने विरोधकांवर आरोप लावणं चूक आहे, असं शरद पवार म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles