21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

चारित्र्यावरून जाच करणाऱ्या पतीला कंटाळून महिला डॉक्टरने संपवले जीवन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बदलापूर घटनेनंतर महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना येथील महिला डॉक्टरने पतीच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. त्यापूर्वी तिने सात पानी पत्र लिहून विवाहानंतर कोणत्या आयुष्याला सामोरे जावे लागले त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे.

 

प्रतीक्षा पत्रात म्हणते, पती प्रीतम चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच हुंडा, फर्निचर मिळावे म्हणून त्याने तगादा लावला होता. आता प्रतीक्षाने आयुष्य संपवल्यानंतर तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षाच्या आत्महत्येनंतर प्रीतम फरार झाला आहे.

 

प्रतीक्षा सात पानी पत्रात म्हणते, डिअर अहो, खूप प्रेम केले तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी, महत्त्वाकांक्षी मुलीला दुर्बल बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं, तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. तरीही तुमचं समाधान झाले नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे संशय संपले नाहीत. सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत आलात.

 

देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही. माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं. सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलले नाही. त्यांनी मला जीव लावला. माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं, म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला.

 

तुम्ही त्यातले पैसे आई-वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आई-वडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेन, माझ्या आई-वडिलांना मी नसले तरी कुणाला आहे. तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ. तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

 

तुमचीच, प्रतीक्षा, अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आयुष्य संपवलं आहे. पतीचा रोजचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles