2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस” लिहिलेले असल्यास होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मधील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खाजगी वाहनांवर ‘पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस’ लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्नुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ.गिरी यांनी दिले आहेत.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, विकी जाधव(पत्रकार) यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस” लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांमधील मधील मोटार वाहन निरीक्षक तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खाजगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस” तसेच वाहनांत ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी किंवा बांध चिन्हांचा वापर वाहनमालक त्यांच्या वाहनांवर करीत असल्याचे वाहन तपासणीमध्ये निदर्शनास आल्यास दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्नुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्यात यावा. असा आदेश सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ.गिरी यांनी पारित केला आहे.

या आदेशानुसार आता राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खाजगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस” लिहिलेले किंवा ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles