मुंबई |
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कंबर कसली असून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना आता रणनीती आखायची आहे. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची मोठी कसरत पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे तसेच महायुतीतील जागावाटपानंतर तब्बल 18 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढताना दिसणार आहे. आता हे १८ मतदारसंघ कोणते जाणून घेऊयात…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमधील वादातीत 18 मतदारसंघ खालीलप्रमाणे :
दिंडोरी- नरहरी झिरवाळ विरुद्ध शिवसेना माजी आमदार धनराज महाले-
कागल- हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे (भाजप)
चंदगड- राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील (भाजप )
मावळ- सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे
इंदापूर- दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील
वडगाव शेरी- सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक (भाजप)
हडपसर- चेतन तुपे विरुद्ध महादेव बाबर (शिवसेना शिंदे)
आष्टी- बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस (भाजप)
कोपरगाव- आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे (भाजप)
अर्जुनी मोरगाव- मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप)
अहिरी- धर्मरावबाबा अत्राम विरुद्ध अमरिश राजे (भाजप)
पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध भाजप आमदार नीलय नाईक
अकोले- किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड (भाजप)
येवला- छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार (भाजप)
अमळनेर- अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिऱिष चौधरी (भाजप)
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर (शिवसेना)
जुन्नर- अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे (शिंदे)
वाई- मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले (भाजप)