पॅरिस ऑलम्पिकमध्ये दहाव्या दिवस भारतासाठी निराशाजनक राहिला दोन स्पर्धेत पदकाची अपेक्षा असताना भारतीय खेळाडूंना पराभावाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जी जियाने पराभूत केले. तर नेमबाजीत महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका या जोडीला स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत 1 गुणाने चीनकडून पराभव पत्करावा लागला. पण दिवसाच्या शेवटी मात्र चांगली बातमी समोर आली ती म्हणजे मराठमोळ्या आविनाश साबळेनं 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये पात्रता फेरीत आक्रमक भूमिका साकारत अंतिम फेरीत धडक मारला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील बीडचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपलचेसध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे. अविनाश साबळे यानं तीन हजार मीटर स्टीपलचेस मध्ये शानदार सुरुवात करत पात्रता फेरीत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यानंतर योग्य नियोजन करतअविनाश साबळेनं 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेस मध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाश साबळे यानं सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. अविनाश साबळेनं सुरुवातीपासून नियोजनबद्ध रितीनं आपला खेळ केला. तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी अविनाश साबळे पात्र ठरला आहे. अविनाश साबळेनं 8 मिनिट 15.40 सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हा ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत अविनाश साबळे पाचव्या स्थानावर राहिला याबाबत बोलताना तो म्हणाला की यावेळी जी एनर्जी वाचवली आहे ती अंतिम फेरीत वापरणार आहे. 7 ऑगस्ट रोजी स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी होणार आहे.