भेसळखोरांना गावकऱ्यांनी “विषकालवे” ही पदवी द्यावी.. – माजी मंत्री सुरेश धस
आष्टी |
दूध भेसळखोरांच्या विरोधात राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा.किंवा जसं वाळू माफिया आणि गुटखा माफियावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई चा समावेश केला तसाच दूध माफीया आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि हा निर्णय आगामी कॅबिनेट किंवा पुढच्या कॅबिनेट मध्येच घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांना करणार असून.अशा भेसळखोरांना आता गावकऱ्यांनी विष कालवे कालवे” ही पदवी बहाल करावी असा उपरोधिक टोला माजी मंत्री सुरेश धस यांनी लगावला ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना धस म्हणाले की,रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी.यासह मुख्य आरोपी असलेल्या व्यक्ती कडून जे जे म्हणून लोक यात सहभागी आहेत त्यांना सह आरोपी करावे.मुख्य आरोपीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड याचे डिटेल्स चेक करून ज्यांनी ज्यांनी यांच्याकडून हा माल नेलेला आहे अशांवर देखील कडक कारवाई करावी.संबंधित भेसळखोराकडे कोट्यवधीची मालमत्ता कुठून आली ?
याचाही शोध घ्यावा.शिवाय या लोकांना मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास चाप बसेल जेणेकरून असले प्रकार राज्यातील थांबतील.आणि राज्य सरकारला ५ रुपये अनुदान देखील देण्याची आवश्यकता लागणार नाही.आणि शेतकऱ्यांच्या दुधाला देखील ४० रुपये लिटर दर मिळू शकेल याबाबत राज्य सरकारने सर्व्हे करावा.
संपूर्ण राज्यातील दूध देणारी जनावरे यांची संख्या किती ?कोणत्या गावचे किती लिटर दूध आहे ? याचा सर्व्हे राज्य सरकारने करावा जेणेकरून यातून खरी माहिती पटलावर येईल.आणि भेसळखोरांना आळा बसेल असेही सुरेश धस शेवटी म्हणाले.