आष्टी तालुक्यातील आमिया टाकळी येथे अन्न औषध प्रशासनाने छापा मारून बनावट दुध बनविण्याचा साठा जप्त केला असून यामुळे आता भेसळयुक्त दुधाची विक्री अनेक किती ठिकाणी होते याचा तपास आता प्रशासन घेत आहे.
बीड जिल्ह्यात दुधाची होतं असलेली भेसळयुक्त विक्री आता चव्हाट्यावर येतं आहे. आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे अन्न औषधं प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाया करत २०० पोत्यापेक्षा अधिक पावडरचा साठा जप्त केल्याचे कळते. काल रात्रीपासून हा साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बनावट दूध विक्रीचा धंदा जोरात सुरु आहे. याबाबत अन्न औषधं प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या समेवत टाकळी अमिया येथे छापा मारण्यात आला. यात २०० गोण्या पावडरच्या साठ्याच्या आढळून आल्या असून अजूनही साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. काल रात्रीपासून पोलीस आणि अन्न प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा साठा अंबादास चौधरी यांचा असल्याचे कळते.याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.