माजलगाव |
माजलगाव येथील भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर आज (दि. ७) सकाळी साडेदहाच्या दरम्यान शाहुनगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील शिवतिर्थ हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
माजलगाव येथील भाजप नेते अशोकराव शेजुळ स्कूटीवरून जात असताना शाहूनगर येथे मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून रॉडच्या साह्याने हल्ला केला. हल्लेखोरांनी रॉडच्या साह्याने त्यांच्या हातापायावर जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा एक पाय मोडला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. शेजुळ यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला. त्या ठिकाणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे