2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

कृषी खात्याच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीवर १४ कोटी रूपये खर्च करण्याचा निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत लाडकी बहिण योजनेच्या प्रसिद्धीवर २७० कोटी उधळल्यानंतर १४ कोटी ६९ लाख ८७ हजार रुपये कृषी खात्याच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीवर खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महिला आणि शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून जनतेपर्यंत निर्णय पोचविण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर ही योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या योजनेच्या प्रसिद्धीवर २७० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुती सरकारला बसू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रसिद्धीचा प्रयत्न आतापासूनच सुरु केला आहे.

 

मध्यंतरी खरीप हंगामाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर फोडले होते. शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना आणतो पण तुम्ही त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या प्रसिद्धीवर साडेचौदा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

 

असा होईल खर्च 

या प्रसिद्धीचा भर सोशल मीडियावर देण्यात येणार असून सोशल मीडियावरील जाहिरातींसाठी अडीच कोटी, डिजिटल मीडियासाठी एक कोटी रुपये, मराठीतील बल्क एसएमएससाठी अडीच कोटी रुपये, खासगी होर्डींगवर दोन कोटी रुपये, पोस्टर, बॅनरच्या छपाईवर एक कोटी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles