19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

उड्डाणपूल व स्लीप रोड कामाच्या श्रेयासाठी क्षीरसागरांनी रिकामी लुडबुड करू नये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

क्षीरसागरांच्या कर्तुत्वामुळे बीडकरांना प्यायला पाणी नाही..!– राजेंद्र मस्के  

बीड |

बीडकरांना गेली पंचवीस वर्षापासून पंधरा दिवसाला एकदा प्यायला पाणी मोठ्या मुश्किलीने मिळते. कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च झाला.  तीस वर्ष सत्ता भोगूनही आज बीड करांचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही. बीड शहराची बकाल अवस्था करण्याचे श्रेय सर्व क्षीरसागरांना जाते. निवडणुका डोळ्यासमोर पाहून, पुन्हा एकदा विकासाच्या नावाखाली क्षीरसागरांनी सुरु केलेली लुडबुड निष्फळ ठरेल. नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्या ऐवजी उड्डाणपूल व स्लीप रोड कामाचे श्रेय घेण्यासाठी लुडबुड करू नये. असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष क्षीरसागरांना दिला आहे.

भाजपा राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, आ. नमिताताई मुदंडा, आ. लक्ष्मण पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदडा यांच्या शिष्ट मंडळाने भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्ली येथे दि. 20/10/2021 रोजी भेट घेऊन बीड जिल्हातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते आणि पुलांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरालगत स्लीप रोड, बाह्य वळण रस्त्यावर उड्डाण पूल, बिंदुसरा नदीवर पूलकम बंधारा, बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी अशा विविध कामांना प्राधान्य देऊन, रस्ते विकासाची कामे मार्गी लावावेत अशी मागणी केली होती. ना. गडकरी यांनी त्यावेळी तात्काळ दखल घेऊन, रस्ते विकासाचे काम हाती घेतले होते. त्या निर्देशानुसार आज कार्यवाही सुरु असून, केवळ पंकजाताई मुंडे व प्रितमताई मुंडे  यांच्या प्रयत्नातून विकास कामांना गती मिळाली आहे. परंतु जसजशी विधानसभा जवळ येत आहे. क्षीरसागर कुटुंबीयांची स्वार्थी धडपड सुरू झाली. कोणी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन फोटो काढणे तर कोणी लोकसभा प्रचारादरम्यान आलेल्या ना. गडकरी साहेबांना निवेदन देऊन, काढलेले फोटो व्हायरल करण्याची नौटंकी करत आहेत. श्रेय लाटण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. हाती सत्ता असताना कर्तव्याची जाण ठेवून, विकासाला प्राधान्य दिले नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून  सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवण्याचा उग्योग केला. सुजान मतदारांना क्षीरसागरांचा लबाडीचा खेळ लक्षात आला आहे.  भविष्यात श्रेय लाटण्याचा रिकामा उद्योग करू नये असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles