23.3 C
New York
Saturday, October 5, 2024

Buy now

spot_img

रील बनवताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा अशी एक खूप प्रसिद्ध कविता आहे. पण मित्रच जर नीट निवडले नाहीत तर जीव गमवावा लागू शकतो याची अनेक उदाहरणे आपल्याच महाराष्ट्रातून समोर येत आहेत.

धबधब्यात उडी मारायला लावणाऱ्या गाडीवर स्टंटबाजी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मित्रांचा सल्ला मागील काही दिवसांमध्ये काही तरुणांच्या अक्षरशः जीवावर बेतला आहे. असेच एक नवीन प्रकरण सध्या समोर येतेय. लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धुळे-सोलापूर महामार्गावर शनिवारी भरधाव वेगात असलेल्या बाईकचा अपघात झाला होता. रील बनवताना झालेल्या अपघातात अनिरुद्ध कळकुंबे या इसमाचा मृत्यू झाला आहे. तर बाईकवरील दुसरा प्रवासी जखमी झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एका मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दोन तरुण हेल्मेटशिवाय महामार्गावर बाईकवरून जात असताना दिसत आहेत. बाईकच्या मागे बसलेली व्यक्ती रेकॉर्डिंग करत असताना बाईक चालवणाऱ्या मित्राला कॅमेराकडे पाहून ‘हाय’ ‘म्हणायला सांगते. सुरुवातीला पुढे बसलेला चालक वळून हसताना दिसतोय, पण इतक्यात ही बाईक दुभाजकावर आदळते, धडकेने दोघे हवेत उडतात आणि रस्त्यावर पडतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टच्या कॅप्शननुसार, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा पाय मुरगळुन जखमी झाला आहे. काही सेकंद तरी हा व्हिडीओ असाच सुरु राहतो व नंतर एक व्यक्ती त्यांच्या मदतीला येते. जखमी व्यक्ती उठून मदत मागताना, ‘माझा पाय मुरगळला आहे आणि रक्तस्त्राव होतोय’, असे म्हणताना ऐकू येते. प्राथमिक माहितीनुसार दोघेही जालना जिल्ह्यातील होते.

अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, मित्रांच्याच हट्टापायी संकटात अडकल्याची अन्य एक घटना ठाणे जिल्ह्यात सुद्धा अलीकडेच घडली होती. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) प्रमुख यासिन तडवी यांच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, आझाद नगर भागातील दर्गा गल्लीतील पाच मुले सायंकाळी पाचच्या सुमारास मुंब्रा टेकडीवरील खडी मशीन परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेली होती. पाचही मुले साधारण १२ वर्षांच्या वयोगटातील होती, त्यातील तीन जण भावंडं होती. पावसामुळे झालेल्या अंधारात ही पाच मुले रस्ता चुकली आणि आरओरडा करू लागली. बऱ्याच वेळाने काहींनी या मुलांचा आवाज ऐकला, त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण त्यांना ही मुले सापडली नाहीत.

शेवटी अग्निशमन दलाला याविषयी माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर, रात्रीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल यांनी शोध मोहीम सुरू केली. डोंगराळ भागात रात्रभर शोध मोहीम राबवून पहाटे ३ वाजता मुलांची सुटका करण्यात या टीमला यश आले

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles