23.3 C
New York
Saturday, October 5, 2024

Buy now

spot_img

विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाचा ‘गेम’ होणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळं 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं आता मतदान होणार आहे. आणि एकाचा पराभव अटळ आहे. महायुतीनं 9 उमेदवार दिलेत, ज्यात भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत उमेदवार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंना निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिलेत. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणिशरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठींबा दिलाय. एक दिवस आधीच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घोडे बाजार करायचा नसेल तर महाविकास आघाडीनं एक उमेदवार मागे घ्यावा, असं म्हटलं होतं. मविआनंच तिसरा अधिकचा उमेदवार दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मात्र, मविआनं तिन्ही उमेदवार कायम ठेवले.

सध्या विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ 274 आहे आणि विजयाचा कोटा 23 मतांचा आहे. महायुतीकडे भाजपचे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वत:चे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. एकूण महायुतीकडे मतं आहेत 197 महायुतीचे 9 उमेदवार आहेत. 9 व्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवीत.

महाविकास आघाडीची मतं पाहिली तर काँग्रेस 37, ठाकरेंची शिवसेना शंकरराव गडाख या एका अपक्षांसह 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं अशी एकूण मतं होतात 66 मतं. मविआचे 3 उमेदवार आहेत. तिसऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवीत. मात्र क्रॉस व्होटिंगच्या भीतीनं काँग्रेसनं प्रत्रा सातवांना 3-4 अधिक मतं दिली तर आणखी मतं लागतील. त्यामुळं इतर छोट्या पक्षांकडे दोघांच्याही नजरा आहेत. बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं प्रहारचे 2, एमआयएम 2 आणि समाजवादी पार्टी 2, मनसे 1 आणि माकपचा 1 आमदार आहे. ही एकूण मतं आहेत 11. मात्र, या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीनं मतदान होणार आहे. त्यामुळं क्रॉस व्होटिंगची दाट शक्यता आहे.

फडणवीस ज्या प्रमाणं सर्व 9 उमेदवार जिंकतील एवढी मतं असल्याचा दावा करत आहेत. त्याच प्रमाणं उद्धव ठाकरेंनीही मतांची जुळवाजुळव केल्याचं म्हटलंय. जागा 11 आणि उमेदवार 12 असल्यानं, मतं फुटणार हे निश्चित आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर रिंगणार असल्यानं निवडणुकीत आणखी रंगत आणलीय. कारण नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध पाहता ते जिंकून येतील असा दावा भाजपच्या दरेकरांनीच केलाय. त्यामुळं मविआचे तिसरे उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांच्याकडेही लक्ष असेल. पण क्रॉस व्होटिंग जर झालीच तर तर धाकधूक महायुतीच्या विशेषत: अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही असेल.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles