20.9 C
New York
Thursday, July 4, 2024

Buy now

spot_img

पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला ; विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला आहे. लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश तिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.

विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते.

पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना पराभव केला. यानंतर लोकसभा निवडणुकीत बहिण प्रीतम यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्या विरोधात निवडणुक लढवली. बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला. ओबीसी-मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडं वळतील, असं भाजपला वाटतं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles