विधानपरिषदेसाठी आता भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. एकूण 5 जागेसाठी 10 नावं भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषद साठी 10 नावे केंद्राकडे पाठवण्यात आले आहे.
पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे आणि चित्रा वाघ यांचं नाव पुढे पाठवण्यात आलं आहे. पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर आता त्यांची विधानपरिषदेत वर्णी लागणार अशी चिन्ह आहे.
विधानपरिषद आमदारकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दहा जणांची यादी तयार केली आहे. यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपकडून एकूण पाच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जातीचे समीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी ओबीसी नेत्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. तर मराठवाड्यातून रावसाहेब दानवे यांचंही नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुका लक्षात घेता शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातून हर्षवर्धन पाटील यांचं नाव यादीत आहे. विशेष म्हणजे, फायरब्रँड प्रवक्त्या चित्रा वाघ यांचं नाव सुद्धा यादीमध्ये आहे. त्यामुळे यंदा तरी चित्रा वाघ यांना संधी मिळणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.
भाजपची १० जणांची संभाव्य यादी
पंकजा मुंडे
अमित गोरखे
परिणय फुके
सुधाकर कोहळे
योगेश टिळेकर
निलय नाईक
हर्षवर्धन पाटील
रावसाहेब दानवे
चित्रा वाघ
माधवीताई नाईक