14.4 C
New York
Tuesday, October 8, 2024

Buy now

spot_img

सोशल मिडियासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्वे जारी केली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यानुसार सुप्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती, आभासी जगातील नामवंत अशा सर्वांसाठी केंद्राने सूचना केल्या आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींनी कायम आपण करत असलेल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती आणि त्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतलेला असावा, जेणेकरून जाहिरातीत त्या उत्पादनाविषयी केले जाणारे दावे खरे आहेत, याची सत्यता त्यांना पडताळून बघता येईल.

तसेच ही उत्पादने किंवा सेवा, या व्यक्तींनी स्वतः वापरुन बघाव्यात, अशा सूचनाही या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आल्या आहेत. शेवटी, अशा जाहिरातींमधून कोणतीही उत्पादने किंवा सेवांची भलामण करतांना ग्राहकांची आणि आपल्या प्रेक्षकांची त्यांनी दिशाभूल करु नये, त्या नियम कायद्यावर आधारित असाव्यात असा या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश आहे.

सर्व सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्तींनी ह्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत, आपल्या प्रेक्षक वर्गासमोर पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक असेल. असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles