2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

लाखात एक ‘गौतमी पाटील’; एका कार्यक्रमाचे तब्बल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.

सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गौतमीच्या कार्यक्रमाची तारीख मिळवण्यासाठी तब्बल एक ते दीड महिना इतकी वाट पाहावी लागत असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणूका लक्षात घेत हे वेटिंग आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते.

गौतमी म्हणजे मोठी पब्लिसिटी त्यामुळे या कार्यक्रमासाठी सुपारी देखील मोठीच असते. मिळालेल्या माहितीनुसार गौतमी एका कार्यक्रमाचे तब्बल दीड ते दोन लाख रुपये घेते. कार्यक्रमात गौतमीसोबत तिची संपूर्ण टीम ज्यांमध्ये टिक्निशियन पासून ते परफॉर्मन्स सादर करकऱ्या तब्बल दहा ते बारा जणांचा समावेश असतो. तसेच ऐन वेळी कार्यक्रमाची तारीख हवी असल्यास गौतमी पाटील आई टीम मॅनेजमेंट सांगेन तितकी सुपारी द्यावी लागत असल्याची देखील चर्चा आहे.

विदर्भ,मराठवाड्यासह आता गौतमीचा बोलबाला पुणे,कोल्हापूर अशा पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यात देखील पाहायला मिळतो. गौतमीचा सर्व तामझाम पाहता एखाद्या अभिनेत्रीहून अधिक अशी गौतमीची क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर गौतमीचे व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसतात. तर अनेकांनी आपण गौतमीचा मॅनेजर असलयाचे सांगत कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी नंबरही व्हायरल केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles