19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

फसवणूक प्रकरणी तिरूमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

एकीकडे ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेने 21 मे पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचं आश्‍वासन दिले आहे, तर दुसरीकडे आज ज्ञानराधावर माजलगावमध्ये दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता फसवणूक प्रकरणी बीडच्या तिरूमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरूमला उद्योग समूह ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडला आहे. बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आणि विविध पाच शहरातील कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी टाकल्या होत्या. बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औरंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

गेल्या सात महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून हजारो ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत. तसेच 21 पासून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळतील असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र असे असतानाही आज माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांच्याविरोधात दोन ठेवीदारांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत. 3 लाख 80 हजार रुपये आणि 1 लाख 10 हजारांची फसवणूक झाल्याप्रकरणी असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सुरेश कुटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीचा गेल्या वर्षी भाजपामध्ये प्रवेश

राज्यातील प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भाजपात प्रवेश केला आहे. सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ असून त्यांनी उद्योग क्षेत्रातून जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. ‘द कुटे ग्रुप’मुळे बीड जिल्ह्यात बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. तसेच समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं महिलांना नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ, हेअर ऑईल, वाहनांचे सुटे पार्ट, पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles