19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणाऱ्यावर करडी नजर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

लोकसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणा-या सायबर विभागाच्या मार्फत जिल्हयातील शेकडो अकांउट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यापासून सोशल मीडिया अकांऊट तपासण्यात येत आहेत. प्रत्येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समाज माध्यमे सर्वाच्या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्यहीन बातमी वा-यासारखी पसरविणाचे सामर्थ्य समाज माध्यमात आहे. त्यामुळे व्हॉट्स अप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन एमसीएमसीच्यावतीने करण्यात आले आहे.
उमेदवारांसाठी सूचना सर्व उमेदवारांना स्वतः च्या समाज माध्यमांची अधिकृत खाती (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम ब्लॉग,) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात सर्व समाज माध्यम प्रतिनिधीनी आपल्या माध्यमांची नोंद आयोगाकडे करावी. समाज माध्यमांवरुन अफवा पसरविणे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक, दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती, याबाबत गंभीर गुन्ह्याची नोंद होवू शकते. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
सामान्यांसाठी सूचना :- निवडणूक काळामध्ये आपल्या समाज माध्यम खात्यावरुन आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जातीय मुद्दयावर प्रचाराच्या पोस्ट टाकणे, धर्म, जात, पात, भाषा या मुद्यावरुन तेढ निर्माण होणा-या पोस्ट प्रसारित न करणे. तथ्यहीन बातम्या प्रसारित करणे टाळावे, अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघात अशा घटना आढळल्यास 8788998499 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे कळविण्यात यावे, भ्रामक पोस्ट पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी कळविले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles