18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

39 बीड लोकसभा मतदार संघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्या,गुरुवार दिनांक 18 एप्रिल पासून सुरुवात होत आहे.

गुरूवार दि. 18 एप्रिल 2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. तसेच याच दिवसापासून 25 एप्रिल 2024 पर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र निशुल्क दिले जातील. तसेच संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील.

नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र( नमुना 26 ) हा 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथपत्र सादर करण्याची अंतिम वेळ दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजे पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मतदार यादीची प्रमाणितपत्र दाखल करावी लागणार आहे. फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.

नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी ₹12,500 /- असून सामान्य वर्गातील उमेदवारासाठी ₹ 25000 इतकी अनामत रक्कम आहे. अनामत रक्कम जमा करून नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढे शपथ घेतील.

नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल सायंकाळी 3.00 वाजेपर्यंत आहे.

नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप केले जाईल. त्यासह जे उमेदवार अपक्ष उभे होतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल. अपक्ष उमेदवारांसाठी दहा सूचक असणे आवश्यक आहे. 29 एप्रिल तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

उमेदवार त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या “सुविधा” या वेब पोर्टलवर ही उपलब्ध आहे. याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. अशा प्रकारे सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन प्रत्यक्षरीत्या सादर करावी लागणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles