-2.6 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

spot_img

दासखेडचे सुंदरराव कोकाटे पाटिल आणि नानासाहेब वाघिरे लोकसभेच्या रिंगणात!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा |

सकल मराठा समाजाच्या वतीने दासखेड गावातुन पोलिस पाटील सुंदराव खंडेराव कोकाटे पाटिल व नानासाहेब एकनाथ वाघिरे यांना एकमताने बीड लोकसभेसाठी उमेदवार म्हणुन निवड करण्यात आली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणापत्र मिळल्या शिवाय  व सरसकट च्या अध्यादेशाची अंमलबजावणी केल्याशिवाय मराठा समाजाने कुठल्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर अथवा  पुढार्यां  बरोबर जाऊ नये. समाजातील व्यक्तीने कुठल्याही राजकीय पक्षाशी बुथ एजंट बनू नये. किंवा प्रचारात सहभागी होऊ नये असा एक मताने ठराव संमत करण्यात आला आहे. तसेच मराठा आंदोलक बांधवावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेणे तसेच कुणबी प्रमाणापत्र मिळण्यासाठी ची तालुका व जिल्हा कमेटी यांनी कामाला गती देणे  समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी तालुका कमेटी निर्माण करणं विनामूल्य काम करणाऱ्या वकील संघाची कमेंट करणे व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करणे असा ठराव संमत करण्यात आला.

या वेळी गावातील मराठा समाजातील विविध सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी.गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles