28.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img

बीडमधून प्रीतमताईंचा पत्ता कट, पंकजा मुंडेंना उमेदवारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अखेर बुधवारी 13 मार्चला महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर झाली.या यादीमध्ये पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी मिळाली आहे. बीजेपीने बीडमधून लढण्यासाठी पंकजा मुंडे यांनी तिकिट देत निवडणूक लढवण्यासाठी हिरवा झेंडा दिला आहे.

 

यंदाच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे ऐवजी पंकजाताईंना संधी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. खुद्द पंकजा मुंडे सुद्धा आपल्या भाषणातून तसे संकेत देत होत्या.

 

बीडचं राजकारण हे मुंडे घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असंच हे समीकरण आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष असला तरी मुंडे घराण्याला टाळू शकत नाही. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून त्या भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत.

 

भाजपमध्ये नेहमीच्या विद्यमान खासदारांनी दुसऱ्यांदा संधी देण्याचं प्रमाणं हे कमी आहे. त्यामुळेच प्रीतमताईंच्या ऐवजी पंकजाताईंना लोकसभेचं तिकीट देण्याची शक्यता जास्त होती आणि अखेर तसंच घडलं. पंकजा मुंडे या निवडणुकीला उभ्या राहिल्या तर मागील 5 वर्षांची कसर भरून काढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यामुळे त्यांना बीडमधील तिकीट दिलं गेलं.

पंकजा मुंडेंना बीडमधून जागा मिळाल्यानंतर आता तिथे शिवसेना ठाकरे गटाकडून किंवा शरद पवार गटाकडून कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles