मुंबई |
येत्या लोकसभेच्या वर्ष २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांचे संकेतस्थळ, तसेच शासनाच्या अधिनस्थ विभागांच्या संकेतस्थळावरीलही राजकीय नेत्यांची छायाचित्रे हटवण्याचा आदेश दिला आहे.
याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना आदेश दिला आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या दिवसापासून या आदेशावर कार्यवाही करावी, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे. ‘निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश रहाणार आहे’, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.