24.3 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

“राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशची निवडणूक समिती यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अंतिम चर्चा ही 29 मार्चला चर्चा झाली. यावेळी 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 145 जागांचा निर्णय झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार, 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावं या यादीत आहे. लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. यामध्ये 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे”, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. “भौगोलिक क्षेत्र मोठे, प्रदेशात आम्ही मोठे, यासोबत एनडीएचा विस्तार करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सलग तिसऱ्यांदा निवडून येऊ. गेल्या दोन निवडणुकांपेक्षा जास्त जागांवर आम्ही निवडून येऊ”, असं विनोद तावडे म्हणाले.

 

“उत्तर प्रदेशच्या 55 जागांची आम्ही घोषणा करत आहोत, प. बंगालच्या 26, मध्यप्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 14 पैकी 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू-काश्मीर 2, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दिव-दमन 1, अशा 195 जागांची आम्ही घोषणा करत आहोत”, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

 

“वाराणसी येथून नरेंद्र मोदी, अंदमान निकोबार येथून बिष्णू पडा रे, अरुणाचल प्रदेश पूर्व किरण रिजिजू, अरुणाचल प्रदेश पश्चिममधून तापिर गाओ, आसाम करिमगंजमधून अनुसूचित जातीकडून कृपानाथ मल्ला, सिलचरमधून परिमल शुक्ला बैद्य, ऑटोनमस जिल्हा शेड्यूल ट्राईब अरमसिंग इसो” अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दोन दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरविण्याबाबत चर्चा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बैठकीला उपस्थित होते. रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आज भाजपकडून अधिकृत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles