20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह बहाल करण्यात आले. असे असताना आता शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला कोणतेही निवडणूक चिन्ह नव्हते. यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचे आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आले होते. त्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वीच आयोगानं दिलं. पण चिन्ह बहालं केलं नव्हतं. पण आता त्यांना ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

याबाबतची माहिती ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ या पक्षाकडून ट्विटरवरून देण्यात आली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!” “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles