20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

निवडणुकीच्या तोंडावर 17 ‘आयएएस’ अधिकारी बदलले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील विविध शहरातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने बुधवारी काढले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे अधिकारी चार वर्षापासून एकाच शहरात आहेत, त्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. तसेच काही अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करत बदली करण्याची विनंती स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.

या सर्व बाबींचा विचार करून राज्यातील 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी, सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.

 

कोणाची कुठे झाली बदली ?

1.नितीन पाटील, विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

2. अभय महाजन, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई येते नियुक्ती करण्यात आली आहे.

3. संजय एल. यादव, सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर, नियुक्ती करण्यात आली आहे.

4. राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

5. राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा, अशी बदली करण्यात आली आहे.

6. अमोल येडगे, संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. मनुज जिंदाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे.

9. अवश्यंत पांडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. वैभव वाघमारे , प्रकल्प अधिकारी, ITDP, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

11. संजीता महापात्रा, प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. मंदार पत्की , प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

13. मकरंद देशमुख सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे.

14. नतिशा माथूर, प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.

15. मानसी, सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली येथे करण्यात आली आहे.

16. पुलकित सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी, ITDP, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग येथे करण्यात आली.

17. करिश्मा नायर, सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, जव्हार आणि सहायक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles