19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

आगामी वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. पुढील महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे. पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे.

 

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापूरनंतर पुण्यातला चौथा दौरा आहे. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं. मुंबईतील ‘न्हावा-शेवा अटल सेतू’चा लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते पार पडला. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles