27.4 C
New York
Saturday, July 26, 2025

Buy now

spot_img

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ॲन्टीबायोटीक देऊ नका! औषध नियंत्रकांचे आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अधिकृत प्रिस्क्रिप्शनवरच ॲन्टीबायोटीक औषधे रुग्णांना द्यावीत, असे आदेश ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया यांनी दिले आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, अँटीमाइक्रोबियल्स लिहुन देताना डॉक्टरांनी त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर नेमके संकेत नमूद करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांना हे तातडीचे आवाहन आहे की, ॲन्टीबायोटीक औषधे लिहुन देताना योग्य कारण नमूद करणे अनिवार्य आहे.” तथापि, पत्रात असे म्हटले आहे की, प्रतिजैविकांचा गैरवापर आणि अतिवापर हे रुग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण करू शकतात. फार्मासिस्टना देखील प्रतिजैविकांच्या वापराबाबत सावध केले जाते आणि प्रिस्क्रिप्शनद्वारेच प्रतिजैविकांची विक्री केली जाते. बहुतेक डॉक्टरांनी या निर्णयाला अनुकूलता दर्शवली आहे, तर काहींनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये गर्दी लक्षात घेता त्याच्या व्यावहारिक अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles