21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

छत्रपती संभाजीराजे काँग्रेसच्या वाटेने! लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या साठी त्यांची चाचपणी सुरू आहे. ते कोल्हापुरातून उभे राहण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान, या साठी त्यांचा कल महाविकास आघाडीकडे असून आघाडीत प्रवेश घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, स्वराज्य पक्षाऐवजी पक्ष प्रवेश करण्याचा पर्याय महाविकास आघाडीने दिल्याची माहिती आहे.

 

संभाजीराजे छत्रपती हे भाजपच्या मदतीने राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले होते. यामुळे ते भाजपचे असल्याचा सर्वांचा समज झाला होता. संभाजी राजे २००९मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, त्यांनी एकला चलोची भूमिका घेत स्वराज्य संघटनेची स्थापना करून समाजकार्य सुरू ठेवले होते. मात्र, सध्या ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. कोल्हापूरसह, नाशिक किंवा मारठवड्यातील एखाद्या मतदार संघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. या साठी त्यांच्या महाविकास आघाडीशी चर्चा सुरू आहेत.

 

‘स्वराज्य’ संघटनेला ते महावीकस आघाडीचा घटक पक्ष बनवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, स्वराज्य संघटनेऐवजी पक्षप्रवेशाचा पर्याय त्यांना आघाडीकडून दिला गेला असल्याचे समजते. त्यांच्या संघटनेला भाजपचा आशीर्वाद असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. त्यामुळे महाविकास आघाडी त्यांच्याकडे संशयी भूमिकेतून पाहत असल्याने ते चर्चेला तयार नव्हते. मात्र, काही दिवसांपासूंन त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

 

 

महाविकास आघाडीत जागा वाटपात स्पर्धा असल्याने त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली गेली आहे. दरम्यान, त्यांना कोणती जागा द्यावी या बाबत देखील चर्चा सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. या बाबत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबरोबर स्वराज्य संघटनेची चर्चा सुरू आहे. सध्या तरी आपली पसंती महायुती नव्हे, तर महाविकास आघाडी असून कोणत्या जागेवरून लढायचे हे लवकरच ठरेल, असे एका वृत्त पत्राशी बोलतांना संभाजी राजे म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles