20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

फेब्रुवारीअखेर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता; आयोगाने बोलावली राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी फेब्रुवारीच्या अखेरीस निवडणुका जाहीर होऊन एप्रिलमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. २०१९ च्या निवडणुकीची घोषणा १० मार्च रोजी झाली होती. त्यानंतर ११ एप्रिल ते १९ मेदरम्यान देशभरात सात टप्प्यांत मतदान झाले.

२०२४ च्या तयारीसंदर्भात निवडणूक आयोगाने ११-१२ जानेवारी रोजी बिहारसह अनेक राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या दोनदिवसीय बैठकीत तयारीचा आढावा घेऊन संभाव्य तारखांवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणूक आयोग ७ जानेवारीपासून आंध्र आणि तामिळनाडूला भेट देऊन लोकसभा निवडणुकीसाठी राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात करेल. २०१९ च्या तुलनेत या वेळच्या निवडणुका थोड्या लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये १० मार्च रोजी निवडणुका जाहीर झाल्या. या वेळी होळी २५ मार्चला म्हणजेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आहे. हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जातील.

 

३१ जानेवारीपर्यंत बदली, पोस्टिंग प्रक्रिया पूर्ण होईल

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदली-नियुक्तीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे की, निवडणुकीच्या कामात थेट सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गृह जिल्ह्यांमध्ये किंवा ते ज्या जिल्ह्यात मुक्काम करत आहेत त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार नाही. या वेळी लवकर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बदली-पोस्टिंग प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles