2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आज शनिवारी (23 डिसेंबर) रोजी बीड येथील इशारा सभेतून 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून, तेव्हा मराठा समाज पुढील वर्षी 20 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे.

मराठा आंदोलक अंतरवाली सराटीतून मुंबईला जाणार असून, ते आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बीडच्या इशारा सभेतून बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांनाही विनंती आहे, बीडच्या या चंपावती नगरीतून विनंती करतो की, येथे एक एक वर्षाचं लेकरू घेऊन माता मावल्या बसल्या आहेत. आमच्या सगळ्यांची वेदना एकच आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या. सरकारनेही शहाणपणाची भूमिका घ्यावी, नाही तर तुम्हाला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

 

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देशातील मोठ्या राज्यातील मोठी जाती संपविण्याचा तुम्ही घाट घातलाय. परंतु तसे केले तर तुमचे राजकीय आस्तित्व संपून जाणार, तुम्ही एकदा प्रयोग केला आहे. त्याचं तुम्हाला भोगावं लागलय. सरकारने ठरल्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्यावं, नाही तर तुम्हाला जड जाईल, आज फक्त बीड जिल्हा आहे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजा घरातून बाहेर पडेल असे म्हणतच मराठा समाजाला मी मायबाप मानलं. त्यांच्याशी माझं माय लेकरांचं नांत आहे. गद्दारी करण्यासाठी आंदोलन उभं केलं नाही. असे म्हणत त्यांनी उपस्थित मराठा समाजाला आपण तुमच्यासाठीच लढत असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

मराठा असला तरी नेता मानू नका

नेता वगैरे मानू नका. आपल्यातील लोकांनी काम केलं तरच नेता माना. मराठा असला तरी नेता मानू नका. आता निवडणुकीत जवळ आला तर चप्पलच दाखवा. आपल्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे मुडदे बघता. तुम्हाला लाजा वाटत नाही का? तुमच्या डोळ्यादेखत आरक्षणासाठी मराठ्याचं लेकरू आत्महत्या करत आहे. तुम्ही नुसतं पाहत आहात. एका दणक्यात आरक्षण द्या. नाटकं कशाला? असा सवाल त्यांनी केला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles