4.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

नगर-कल्याण हायवेवर तिहेरी अपघात, कुटुंब जाग्यावर संपलं, तब्बल 10 जणांचा मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा जवळ भीषण अपघात झाला आहे. रिक्षा, पिकअप आणि ट्रक असा तिहेरी अपघात घडला. या घटनेत 10 जण ठार झाल्याची माहिती आहे.यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

 

जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा जवळ प्रवासी रिक्षा, पिकअप आणि ट्रक असा तिहेरी अपघात झाला. यात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी व दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. एकूण मयतांची संख्या 10 आहे. गणेश मस्करे -30 वर्ष, कोमल मस्करे – 25 वर्ष, हर्षद मस्करे – 4 वर्ष, काव्या मस्करे – 6 वर्ष, अशी मृतांची नावे असून उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

 

पुणे-नाशिक महामार्गावर चौघांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 15 दिवसांपूर्वीच पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावर अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

 

नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळला काल त्याखाली दबली गेली. या घटनेत अकोले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की क्रेनने कार तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांह रांगा उभ्या राहिल्या आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles